Saturday, 25 June 2016
Friday, 24 June 2016
विश्वास नांगरे पाटील म्हणतात (vishwas nangare patil)
विश्वास नांगरे पाटील म्हणतात,
परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , *"मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ."*
चहा कडवट लागला . नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई *कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे .* काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
सैराट करमणूक म्हणून पहा पण *आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .*
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .
केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत
1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.
आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!
Thursday, 23 June 2016
तलाठी लिपिक पदांसाठी मोठी भरती लवकरच
सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.
♥किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
♥परीक्षा कधी?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

BSF बीएसएफमध्ये विविध पदाच्या जागा
बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत.याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे.अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.
Wednesday, 22 June 2016
Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-

- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा

राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
Subscribe to:
Posts (Atom)