आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Tuesday 28 June 2016

Zade Lava Zade Jagva (झाडे लावा झाडे जगवा)

वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे  

जेव्हा मानवाने ह्या जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते 

जगण्यासाठी जग लागतं
झाडे लावा !!, झाडे वाचवा!! , झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा !!!!

तरच तुम्ही वाचाल.                                 
------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------



जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा