आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Thursday, 7 July 2016

लग्न म्हणजे काय (What is marriage )


लग्न म्हणजे काय
What is marriage



लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला मस्त म्हणायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही म्हातारा झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं
मी जाड झालेय का? या वाक्याला
कधीही हो म्हणायचं नसतं
लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घरच्या नात्यांना 
आपुलकीने जपायचं असतं
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना 
हसत हसत विसरायचं असतं
थोडक्यात काय?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं compromise असतं
कारण we will grow old together
असं एकमेकाला केलेलं promise असतं...
आय लव यू प्रिंसेस

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा