आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Monday 27 June 2016

ITI Admission प्रवेश प्रक्रिया 2016-17

ITI व्यवसाय शिक्षण  प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यशासकीय  खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश  DVET, 
Maharashtra State ITI Admission 2016 -17 




ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.27 जुन 2016

शेवट दिनांक 10 जुलै 2016 


अधिकमाहितीसाठी क्लिक करा    Click Here
 (Click here for Admission Time Table ) 

ऑनलाईन अर्ज खालील लिंक ओपन करा

Saturday 25 June 2016

Friday 24 June 2016

विश्वास नांगरे पाटील म्हणतात (vishwas nangare patil)


विश्वास नांगरे पाटील म्हणतात,


परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , *"मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ."*

चहा कडवट लागला . नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई *कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे .* काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार. 
सैराट करमणूक म्हणून पहा पण *आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .*
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .


केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत

1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले. 


आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!


Thursday 23 June 2016

तलाठी लिपिक पदांसाठी मोठी भरती लवकरच

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.
♥किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
♥परीक्षा कधी?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा