आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Thursday 23 June 2016

BSF बीएसएफमध्ये विविध पदाच्या जागा

बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा


बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत.याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे.अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.

Wednesday 22 June 2016

Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?





एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

Tuesday 21 June 2016

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा